चारोळ्या
रागात असो ताकद -
प्रेमात हत्तीचं बळ !
म्हणून तर प्रेमात -
फुलते गुलाबफूल !
चांगल्यातपण कधी -
वाईट गुण असते !
वाईटातपण कधी -
चांगले गुण असते !
सारं काही घडूनही -
न घडल्याचे वाटते !
काही न घडतापण -
घडल्याचेच वाटते !
चुकीचे घडते तेंव्हा -
चूक कळून चुकते !
चूक कळल्यांति मग -
चूक सुधारता येते !
रागावणारे आपले -
छळणारेही आपले !
आपलेपण आपले -
दूरचेपण आपले !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं .07620540722

Post a Comment
0 Comments