Type Here to Get Search Results !

जुन्नर तालुका शिवनेरी दिनदर्शिका २०२५चा प्रकाशन सोहळा उत्साहात.



जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिवनेरी दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन सोहळा २३ डिसेंबर २०२४ रोजी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे राजा शिवछत्रपती सभागृह जुन्नर या ठिकाणी संपन्न झाला.सदर शिवनेरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेवजी शेलार साहेब यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये शिवनेरी दिनदर्शिका जुन्नर तालुक्यातील सर्व शाळांना व शिक्षकांना दरवर्षी पुरवली जाते.त्याचप्रमाणे शिक्षक संघाची गौरवशाली परंपरा, इतिहास याबद्दल माहिती दिली.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,उपाध्यक्ष विनायक ढोले,जिल्हा संघ प्रतिनिधी रामदास संभेराव,संतोष पानसरे,जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापती अनिल कुटे,उपसभापती सुनीता वामन,मानद सचिव अंबादास वामन,पतसंस्थेचे सर्व संचालक,जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष विकास मटाले,रवींद्र वाजगे,उपेंद्र डुंबरे,कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ,नेते विश्वनाथ नलावडे, प्रवक्ते राजेंद्र चिलप, प्रसिद्धीप्रमुख दिपक मुंढे,नेते भरत बोचरे,सदू मुंढे,दत्ता ढेंबरे,महिला आघाडी कार्याध्यक्ष उज्वला लोहकरे,सुवर्णा ढोबळे,अलका घोलप तसेच तालुक्यातील संघ शिलेदार फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.मी कसा घडलो याबद्दलची माहिती महादेवजी शेलार साहेब यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आपल्या सभासदांसाठी अतिशय उपयुक्त अशी सभासद मृत्यु मदतनिधी योजना राबवित असल्याबद्दल गौरव उदगार काढले.प्राथमिक शिक्षकांमुळेच माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली.आज मी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झालो आहे याचे सर्व श्रेय माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला व शिक्षकांना आहे.असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय  मनोगतामधून खंडेराव ढोबळे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांची सर्वात बलाढ्य अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना असून शिक्षकांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणारी अशी ही संघटना कार्य करत आहे.जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने प्रकाशित केलेल्या शिवनेरी दिनदर्शिकेबद्दल तसेच सर्व देणगीदार व कार्यकारिणी यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस प्रभाकर दिघे यांनी केले तर आभार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments