Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्या सोबत वाचा सूर्यकांत कामून यांची रचना



 चारोळ्या 

जुन्याचा नको विसर -

नव्याचे करू स्वागत !

गेले त्याची खंत नको -

नव्यात आणू वसंत !


वर्ष संपले म्हणजे -

वर्ष नवे येणारच !

नव्याच्या स्वागतक्षणी -

जुन्याला कां द्यावे ठेच ?


वेळ आपला अमूल्य -

आपणा ठाव असावे !

कुणा किती वेळ द्यावे -

आपणच ठरवावे !


कुणा काय करायचे -

बिनधास्त करू द्यात !

आपल्यात किती बळ -

लढताना होई ज्ञात !


प्रश्नांना उत्तर आहे -

पण विचारतो कोण ?

प्रश्नांकितच चेहरे -

उत्तरात आहे कोण ?

@ कवी - सूर्यांबिका , सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments