Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


झाडावरचं फूल हे -

झाडाची असते शान !

आईच्या कुशीत जसं -

तान्हुलं दिसते छान !


आई आपली आईच -

देवाहून भली मोठी !

बाप म्हणालात तर -

आईविना कोरी पाटी !


मुलीला मुली मानता -

तसं सुनेलाही म्हणा !

मग घरदार, जग -

जणू मंदिरच म्हणा !


स्वतःला समजावणे -

खूपच कठीण आहे !

जगाला समजावणे -

खूप सोपे काम आहे !


आत्ता सगळ्याच गोष्टी -

हाताबाहेरच गेल्या !

जे काही सोपे वाटले -

त्याही अवघड झाल्या !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर 

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .07620540722

Post a Comment

0 Comments