Type Here to Get Search Results !

कवयित्री कांचन मून यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर.



भिडेवाडाकार फुलेप्रेमी विजय वडवेराव आयोजित देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानाच्या यंदाच्या आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाज रत्न पुरस्कारासाठी  पुणे जिल्ह्यातील विमलाबाई लुंकड विद्यालय गुलटेकडी पुणे येथील उपक्रमशील ,तंत्रस्नेही, शिक्षिका कवयित्री कांचन श्रीराम भरणे उर्फ कांचन सुनील मून यांची निवड करण्यात आली आहे. भिडे वाडाकार फुलेप्रेमी कवी विजय वडवेराव आयोजित  देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत  क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले आणि माय सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा घेऊन या चळवळीत काम करणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी कार्याला गती, प्रोत्साहन मिळावे म्हणून आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार नुकतेच 13 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव  या सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी भिडेवाडा देशातील पहिले मुलींची शाळा जिल्हास्तरीय कवीसंमेलनात विमलाबाई लुंकड विद्यालयातील कांचन श्रीराम भरणे (कांचन सुनील मुन) यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे 2 जानेवारी ते 5 जानेवारी 2025 दरम्यान देशात पहिल्यांदाच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये एस एम जोशी सभागृह पुणे येथील सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे या पुरस्कारासाठी निवड झाल्याने कांचन श्रीराम भरणे यांचे फुले प्रेमी कवयित्री कविताताई काळे, कवयित्री रेखा फाले, कवयित्री उमा लुकडे कवयित्री शुभांगी शिंदे कवी, रणजीत पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.त्याचप्रमाणे त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक श्री संदीप सातपुते सर , शिक्षिका कवयित्री वर्षा शिंदे, कवयित्री सुनीता पवार , संगिता चौधरी ,पल्लवी चितळकर, जयश्री कुंभार , नसरीन पटेल मॅडम यांनी त्यांचे अभिनंदन केले  तसेच कवयत्री कांचन मुन यांची आई  उषा भरणे व सासूबाई सत्यभामा म्हणून यांनी त्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments