Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



  चारोळ्या 


मुलानं बापासमोर -

मुलासारखं वागावं !

बाप होताच बापाचा -

बाप कां होऊ पहावं ?


समजून घेणं आणि -

समजावून सांगणं !

याला म्हणावं आपलं -

समजुतीचं जीवन !


कामाचं म्हणालं तर -

कामाशीच मतलब !

कामाव्यतिरिक्त काम -

हातचे करी खराब !


आपली चूक आपणां -

कळणार तरी कधी ?

चुकल्याचे सांगायला -

हवा आपला विरोधी !


चुकलं तर चुकू द्या -

चूक कळून चुकेल !

पुढील होणारी चूक -

आपण टाळू शकाल !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments