Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


भर उजेडात आज -

अंधार गडद झाला !

दिवे पेटवून पण -

उजेड येईना झाला !


बोलणं कठीण झालं -

वागणं कठीण झालं !

आत्ताच्या जगात तर -

चालणं कठीण झालं !


भोगणं काय असतं -

उभ्या जन्मात भोगलं !

पुन्हा जन्माला येऊन -

भोग भोगावं कसलं ?


माझा मी ना ओळखलो -

ओळखू कसा मी कुणा ?

प्रेमात बुडावे म्हणतो -

प्रेमाच्याही नाही खुणा !


आज तर मेलो आहे -

उद्यापण मरणार !

जिवंत राहून पण -

मेल्यागत राहणार !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर 

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments