प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
जगात पहिल्यादाच झालेल्या फुले फेस्टीव्हलमध्ये १५०० हूनअधिक कवी, रसिक फुले प्रेमींनी हजेरी लावली. नुकताच २ ते ५ जानेवारी दरम्यान पुणे येथे एस. एम. जोशी सभागृहात हा फेस्टिव्हल थाटात संपन्न झाला. कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा काव्य जागर अभियान अंतर्गत काव्य महोत्सव, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक, सांगितिक पोवाडे सादरीकरण, एकपात्री प्रयोग, गझल मुशायरा असा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
६०० हुन अधिक कवींना भारतीय संविधान ग्रंथ, फुलेप्रेमी पेन, सन्मानचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र भेट देण्यात आले.
क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या विचारांचा वारसा ,वसा घेऊन कार्य करणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी, कार्याला गती प्रोत्साहन मिळावे म्हणून या फेस्टीव्हलमध्ये २५ आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाज रत्न पुरस्कारांचे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.जुन्नर शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या शिक्षिका ,कवयित्री, लेखिका सरिता म्हेत्रे कलढोणे यांना फुलप्रेमी समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे समाजातील शैक्षणिक, साहित्यिक मान्यवरांकडून त्यांचे कौतूक होत आहे.
Post a Comment
0 Comments