चारोळ्या
तिळगुळ देत हाती -
गोड बोला कां म्हणती ?
गोड बोलूनच आज -
जगा फसवू पाहती !
तिळपण महागले -
गुळपण महागले !
' तिळगुळ ' द्यावे कसे -
गोडपण महागले !
मोठे मैदान मारून -
नेते झालेत मोठाले !
गरिबांचे राजरोस -
गळेच कापू लागले !
माझ्या डोळ्यावर माझा -
विश्वास नाही राहिला !
डोळा चक्क दिसूनही -
खोटाच खरा ठरला !
अश्रू पितच जगलो -
आत्ता नाही डोळा पाणी !
तहान लागली तर -
रक्ताचे करीन पाणी !
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments