Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


खोटं दुपारपर्यंत -

सगळं विकलं होतं !

सांजवेळ झाली तरी -

सुख बसूनच होतं !


ऐकणं सोडून दिलं -

पाहणं सोडून दिलं !

आत्ताचं जग पाहता -

सांगणं सोडून दिलं !


जेंव्हा केंव्हा दुःख येतं -

तेंव्हा रडवून जातं !

खरं तर दुःखामुळं -

जगणं शिकता येतं !


कुठल्यापण गोष्टीला -

वेळच यावी लागते !

खरंखोटं कळायला -

वेळच सांगू पाहते !


आपल्यापेक्षा लोकांना -

बरंच काही कळतं !

आपण चुकतो तेंव्हा -

लोकांना आधी कळतं !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments