चारोळ्या
रावणाची लंका होती -
लखलखीत सोन्याची !
फक्त एका चुकीमुळे -
लंकाच जळाली त्याची !
शिस्तीत चालणारेच -
शिस्त मोडू लागलेत !
बेशिस्तांचे तर हात -
पोचले वरपर्यंत !
खोटेनाटे जग आहे -
जरा सांभाळून चला !
कोण कधी फसवेल -
कळेल कसे कुणाला ?
चांगली जीवनशैली -
आपली खरी ओळख !
जग म्हणो काहीपण -
आपण वागावे चोख !
रीत-पध्दत बदला -
आयुष्यही बदलेल !
मग आपलं आयुष्य -
आनंदे जगू शकाल !
@ कवी - सूर्यांबिका सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments