चारोळ्या
वाट ती माझीच होती -
दिशाही माझीच होती !
मला फसवून कुणी -
आपलीशी केली होती !
आपणच एक सत्य -
नसे कधी अर्धसत्य !
आपले वास्तव्य हेच -
जगा सांगे पूर्णसत्य !
दिवस दिवस तशी -
रात्र रात्रच असते !
रात्रीचा दिवस होणे -
खूप कष्टाचे असते !
सर्व प्रश्न सुटतात -
असे कधीच नसते !
काही जितल्या तिथेच -
सोडून द्यावी लागते !
म्हणतात प्रयत्नांनी -
आपणा भेटतो देव !
प्रयत्न इतके झाले -
तरी कां भेटेना देव ?
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं .07620540722
Post a Comment
0 Comments