चारोळ्या
जे जे करतो आपण -
सारं काही पोटासाठी !
पोटंच नसतं तर -
जगणंही कशासाठी ?
हाती हात असलं की -
सगळीच कामं सोपं !
पाठीत जर कां थाप -
अवघडपण सोपं !
चांगल्या माणसातही -
वाईट गोष्ट असते !
सर्वांचे हित जपणे -
ही त्याची चूक असते !
माणूस काय कामाचा -
यंत्रेच माणसे झाली !
माणसाजागी यंत्रेच -
आज कामाला लागली !
आजवर जे घडलं -
ते माझ्या कर्माचं भोग !
पुढे जे घडते आहे -
म्हणेन चांगला योग !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments