Type Here to Get Search Results !

सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.



राजुरी, दिनांक ३ जानेवारी,

आज सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग राजुरी मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 



महाविद्यालयाचे उप -प्राचार्य पी बलरामाडू सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख आणि महिला शिक्षक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिले. याप्रसंगी महिला शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्यामध्ये, वाघ मॅडम, निचित मॅडम, औटी मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली तसेच देशपांडे सर आणि नवले सर यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि जीवन चरित्र सांगितले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे , विश्वस्त, प्राचार्य, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments