Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या


नट फाटक्यात तर -

तसं जग फाटक्यात !

नट्या विवस्त्रात तर -

जगपण विवस्त्रात !


आज जगच झोपलं -

समाजही झोपलेलं !

नटनट्यांचं वागणं -

जगही अंगिकारलं !


श्रीमंतांच्या श्रीमंतीचं -

नको कधी प्रदर्शन !

गरिबीतली गरिबी -

लाखमोलाचं जीवन !


माझा मी आज स्वतःला -

शुन्यातच हरवलो !

शुन्यात इतकं काय -

स्वतः मी शोधू पाहतो !


मीच माझ्या देहासवे -

सदा लटकत गेलो !

जीवन कळण्या आधी -

समाप्तीला मी लागलो !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .07620540722

Post a Comment

0 Comments