चारोळ्या
देवा, दिला तू आम्हाला -
कान,नाक,डोळे,मेंदू !
सारंकाही देऊनही -
माणसा कां केलं अधू ?
डोळे उघडून जगी
कुणी पाहिनासे झाले !
डोळे बंद असूनही -
कसे आंधळे बनले ?
देश विकणारा इथे -
खरा देशभक्त होतो !
देशहित जपणारा -
चक्क देशद्रोही होतो !
दिवसाच लुटतात -
त्यांना नेते म्हणतात !
रात्री लुटतात त्यांना -
चोर कां रे म्हणतात ?
खोटेपण आपल्याला -
आजच्याला सुख देतो!
भविष्यात खोटेपण -
शिक्षा भोगाया लावतो !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं.०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments