Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या पूज्य महात्मा गांधी यांच्याविषयी चारोळ्या



 पुज्य म. गांधी विषयी चारोळ्या 


आज माणसाला तर-

माणूस कळेना कधी !

गांधी तर खूप लांब -

कळणार कधी गांधी ?


किती रे मुर्ख आपण -

पैगंबराला मारलं !

येशूख्रिस्तला मारलं -

गांधींनापण मारलं !


गांधींना कितीही मारा -

गांधी मरणार नाही !

मारणारे मरतील -

गांधी कधीचेच नाही!


गांधी जगलेत कसे -

गांधी वागलेत कसे ?

जगी गांधीचेच नाव-

जग घेते तरी कसे ?


सात जन्म घेतले तरी -

गांधी कळणार नाही !

फक्त एकाच जन्मात -

गांधी कसे कळू पाही ? 

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून ) 

मो .नं .०७६२०५४०७२२

सूर्यकांत ना .कामून ( कवी - सूर्यांबिका )

७, राजेश कोठे नगर, मार्केट यार्ड मागे,हैद्राबाद रोड , सोलापूर - ४१३००६

मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments