चारोळ्या
वरवरून माणूस -
खूपच छान दिसतो !
त्याच्या आतला माणूस -
कधी दिसत नसतो !
उपाशी होतो परंतु -
कालवर ठीक होतो !
आज तुपाशी परंतु -
उदास कां वाटतो ?
करू द्या वार कितीही -
झेलत राहिन वार !
नाही कधी झुकणार -
नाही कधी वाकणार !
सुखात असता मज -
जगणं नाही कळलं !
दुःखात असता मज -
जगणं कळू लागलं !
घराशी लढणं और -
जगाशी लढणं और !
घराशी वाटतं सोपं -
जगाशी कठीण फार !
@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments