गणगणे विद्यालय वढाळी देशमुख ता. अकोट जि.अकोला येथे नुकताच प्रशांत दामले यांचा समाज प्रबोधन पर तुफान कार्यक्रम आयोजित केला होता. वेगवेगळ्या कवितांचे सादरी करण विनोदी किस्से सांगून विद्यार्थ्यांचे मनोरंजनातून प्रबोधन झाले त्याचबरोबर मुलींनी गोड बोलणार्या व्यक्तींकडून दूर राहावे, मुलींच्या सुरक्षिततेबद्दल ते बोलत होते दिवसेंदिवस मुलींचे अपहरण वाढत चालले आहे मुलींनी सावध राहावे कुठल्याही प्रसंगी बळी पडू नका , मुलींनी घरा बाहेर पाऊल टाकन्या आधी आई वडीललानचा विचार करावा, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी शालेय जीवन जगत असताना आपण फक्त शिक्षणाकडे लक्ष द्यावे, झाडे लावावे प्राणी मात्रांवर प्रेम करावे, ज्येष्ठ नागरिक आणि गुरुजनांचा आदर करावा , गुरुजी शिकवत असताना लक्ष पुस्तकात असावे मन लावून अभ्यास करावे, जीवन आनंदात जगावे इतर ही लोकांना जगण्या साठी प्रेरणा द्यावी कारण बालपण पुन्हा मिळत नाही, या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाचे शंभर टक्के परिवर्तन होणार याची मला खात्री आहे. आपण खूप मोठे व्हावे सोबतच शाळेचे गावचे राज्य देशाचं नाव रोशन करावे, विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
प्रशांत दामले यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा
January 31, 2025
0
Tags

Post a Comment
0 Comments