चारोळ्या
उगवता सूर्य हवा -
उमलतं फूल हवं !
बाळाच्या हसण्यातलं -
निरागस भाव हवं !
वाईट माणसांपण -
जिंकू द्यायला पाहिजे !
पण चांगला माणूस -
हरला नाही पाहिजे !
कसंबसं जगताना -
कुणी नाही फिरकले !
आज सुखात जगता -
जवळ येऊ लागले !
कधीतरी मरणार -
आत्ताच कां मरायचे ?
काही चांगले करून -
जग सोडून जायचे !
जग सोडून जाताना -
सोबत येतो कां पैसा ?
केवळ गरजेपुरता -
कामी येतो आहे पैसा !
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments