Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



चारोळ्या 

जिथे उपस्थिती हवी -

तिथे कां गैरहजेरी ?

जिथे उपस्थिती नको -

तिथे कां माझी हजेरी ?


वास्तवातले जगणे -

खरे जगणे असते !

अवास्तव जगण्यात -

कसले जीणे असते ?


जिद असून अंगात 

जिंकता कसे येईना ?

कधी कधी हरुनही -

जिंकल्याचे वाटे मना !


सुखाच्याच मागे आज -

सगळेच धावतात !

दुःख येऊ पाहताच -

सारे दूर पळतात !


आपलंही एक जग -

आपण पाहत नाही !

आपलं जग सोडून -

इतरांचंच कां पाही ?

@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments