चारोळ्या
वाचायचे झाले तर -
लोकांचे चेहरे वाचा !
प्रत्येक चेह-यावर -
दिसेल ऋग्वेदी वेचा !
स्वतःच्याच जगण्यात -
आपली हवी जिगर
जगाला कळेल मग -
आपण किती माहीर !
आपल्यातच नसेल -
आपले - आपलेपण !
आपले म्हणून मग -
कां स्वीकारावेत ' पण ' ?
सध्याच्या घाईगर्दीत -
स्वतःला शोधत गेलो !
स्वतःला शोधत जाता -
स्वतःच मी हरवलो !
बोलता सर्वांना येतं -
कुणी बोलतच नाही ?
सगळेच गप्प कसे -
कारण कळत नाही !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments