Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


सैफ वाचला, परंतु -

महाराष्ट्र कुठे सेफ ?

मुख्यमंत्री सांगतात -

महाराष्ट्र खूप सेफ !


सुसंस्कृत महाराष्ट्र -

समंजस महाराष्ट्र !

आज कुठे कां दिसेना -

शांत, सभ्य महाराष्ट्र ?


पट्टीचे ते बोलणारे -

पट्टीचे ते लिहिणारे !

पट्टीचे ते लढणारे -

आज गेले कुठे सारे ?


आम्ही भाकर मागता -

ते धर्म विचारतात !

धर्म सांगितलं तर -

आमचं पोट भरतं ?


जगी मुर्खांचा बाजार -

मुर्खांची जास्त चलती !

मुर्खाच्या राज्यात मग -

शहाणे कसे चालती ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments