चारोळ्या
सत्य बोला , सत्य ऐका -
सत्यात जगणे शिका !
सत्यात ईश्वरी अंश -
सत्याला जागणे शिका !
सूर्यापुढे दिव्याची रे -
नसो कसली महती !
अंधारात सूर्यापेक्षा -
दिव्याची गरज मोठी !
जगणे कळेना झाले
मरणे कळेना झाले !
कसेबसे जगूनही -
जगता येईना झाले !
देवालापण कळेना -
माणूस किती हैवान !
देवच पछतावतोय -
माणसा जन्म देऊन !
काही मिळो वा न मिळो -
आहे त्यात सुख माना !
जगणे किती सुंदर -
कळेलच जगताना !
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो. नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments