Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



चारोळ्या 


सोडणारे सोडतात 

साथ आपली कसेही !

साथ निभावणारेच -

निभावतात कसेही !


माझंच खरं म्हणून -

खरं करतो कां दावा ?

खोटं करतं रोजच -

खोटेपणाचा कांगावा !


बदलू द्या कितीपण -

जगाची चालचलन !

आपण मात्र आपली -

चालावे कास धरून!


गरजेनुसार जगी -

जो तो चालत असतो

आपण पडलो तेंव्हा -

उठवाया कुणी येतो ?


इतरांपेक्षा आपली -

ओळख असो लहान !

आपली ओळख मात्र -

जगी ठेवा नित्य छान !

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

(सूर्यकांत ना . कामून )

मो.नं.०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments