Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


आपण चुकतो तेंव्हा -

दुसरीकडेच कां बोट ?

आपली चूक आपण -

मान्य कां नाही करत ?


जग खूपच शहाणे -

आपण तेव्हढे मुर्ख !

बरोबर असूनही -

चुकीचे काढतो तर्क !


आपल्यात काय कमी -

आपणां कमी लेखतो ?

आपलीपण हुशारी -

जगा दाखवा म्हणतो !


लोक म्हणेल तोवर -

गप्प कशाला बसावं ?

आपलं कम करून -

जगा दाखवून द्यावं !


आपण चुकतो कुठे ?

आपण पाहत नाही !

कोण कुठे चुकतोय -

पाह्यची करतो घाई !


आपलं काय सांगू मी ?

आज इथं उद्या तिथं !

निश्चित सांगावं असं -

ठिकाण आहेच कुठं ?

@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर 

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं. 07620540722

Post a Comment

0 Comments