चारोळ्या
जगात आलो म्हणजे -
येऊन जाणे नसते !
काही सत्कर्में करून -
आपणां जाणे असते !
चौदानंतर माणूस -
अति मंदच कां झाला ?
तत्पूर्वी माणूस मात्र -
माणसासवे ना जगला ?
सोयीनुसार चालते -
आजचे राजकारण !
मेल्याचे ना दुःख ,पण -
सुखांत राजकारण !
छत्तीस कोटी देवही -
काही करणार नाही !
आज जे चाललं आहे ते -
कुणी रोखणार नाही !
खरे बोलता आपणां -
हरिश्चंद्र आठवतो !
खोटंच बोलला तर -
अंधभक्त आठवतो !
नैतिकतेपेक्षा सध्या -
रणनीती महत्वाची !
खुर्ची टिकविणे हीच -
मंत्र्यांची नीती आजची !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं.०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments