Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


सांगणारे सांगतात -

लोकांना खूप काहींसे !

ऐकणारे ऐकूनही -

कानाडोळा करी कसे ?


सारे बदलले तरी -

हरकत नाही काही !

आपण आपली नीती -

बदलू नये कधीही !


आपणच आपल्यांना -

आपले खूप मानतो !

आपले मात्र आपणां -

कधी मानत नसतो !


किंतू काहीपण असो -

हेतू चांगला असावा !

चांगल्या कामी आपला -

देह झिजत ठेवावा !


असं नाही तसं नाही -

सारे सांगू पाहतात !

असंच आहे म्हणून -

कुणी कधी सांगतात ?

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

(सूर्यकांत ना .कामून )

मो.नं.०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments