चारोळ्या
जिवंतपणी माणूस -
ओळखूच येत नाही !
मेल्यावर मात्र त्याची -
ओळख कां येत राही ?
खुलले दैव हे माझे -
भेटला मजला देव !
आत्ता ना कसली चिंता -
फकिरा मिळाले नाव !
आपल्या जन्मासोबत -
मृत्यूही सोबत येते !
जन्मासवे मृत्यूवर -
असावे प्रेमाचे नाते !
भूक मारून जगणे -
दुःखाच्या रोज नशिबी !
ढेकर देत जगणे -
सुखाच्या रोज नशिबी !
जिंदगी माझ्यापासून -
तोंड फिरवून आहे !
काय चुकलं म्हणून -
आज ती नाराज आहे ?
चांगलं घडूनपण -
चांगलं घडेना काही !
वाईट घडून पण -
चांगलं कां घडू पाही ?
दुःख माझे हे गंधार
जख्म माझे हे मंदार !
असे जगताच झाले -
दुःख झाले गुलजार !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं. 07620540722
Post a Comment
0 Comments