Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 आयुष्य सुंदर आहे 

हसत खेळत जगा !

जगणे आपल्या हाती

जगता कळेल बघा !


माणसाचं मोठेपण 

त्याचं स्वभाव सांगतं !

त्याच्या जवळचा पैसा -

माणूस बिघडवतं !


जिथं आपलं हृदय -

तोच आपला खजिना !

क्षण एक जगण्याला -

तोच उत्तम दागिना !


सारी जिंदगीच आम्ही -

आलो जगत-मरत !

निदान मरणक्षणी -

क्षण राहू दे जिवंत !


नीट जगूनदेखील-

नीट जगता येईना !

नीट जगावे म्हणता -

नीटसे काही होईना !


नेमकं काय चाललं

काहीच कळेना झालं !

सत्य सांगणारा पण -

खोटं बोलाया लागलं !

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना.कामून )

मो.नं. 07620540722

Post a Comment

0 Comments