Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 

झाडे बहरून आली 

पानेपण शहारली !

आत्ता मुक्या वाटापण -

बेफाम बोलू लागली !


हसलो कधी फसलो

कधी जिंकून हरलो !

मान-अपमान मात्र - 

कधीच ना मी पाहिलो !


आज जे घडले आहे -

उद्या घडत नसते !

आजचे आज असते -

उद्याचे और असते !


नसता कुणा काळजी -

कां जाळावेत काळीज ?

आपले काळीज बघा -

किती काळजीत आहे ?


तुला पाहून आजही -

न पाहिल्याचे वाटते !

ओळख गाढ तरीही -

ओळखूच कां न येते ? 


तुला पाहता पाहता -

खूप लिहिल्या कविता !

प्रत्यक्ष जीवनी मात्र -

जन्मा न आली कविता !

@ कवी -सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं.०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments