Type Here to Get Search Results !

समर्थ शैक्षणिक संकुलात निर्भय कन्या अभियानाचे आयोजन



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर 

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स व समर्थ लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने "निर्भय कन्या अभियाना" अंतर्गत संकुलातील विद्यार्थीनींसाठी 'कराटे प्रशिक्षण कार्यक्रमा' चे आयोजन करण्यात आले होते.या अभियानामध्ये संकुलातील ७५० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

स्त्री सबलीकरण आणि सक्षमीकरण काळाची गरज आहे.संकुलामध्ये महिला सबलीकरण,व्यक्तिमत्व विकास,स्वास्थ्य,महिला उद्यमशीलता,स्त्री-पुरुष समानता यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना बौद्धिक,शारीरिक,मानसिक व भावनिक इ.स्तरावर सक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो.

आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने संकुलातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी निर्भया पथक सदस्या ज्योती दहिफळे व कांचन रानडे उपस्थित होत्या.



विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ज्योती दहिफळे यांनी निर्भया पथकाचे कार्य,निर्भया पथकामार्फत विद्यार्थिनींना कशाप्रकारे मदत व सहकार्य मिळवून दिले जाते याबद्दल सविस्तर विश्लेषण केले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळण्यासाठी ११२ हा क्रमांक डायल करून पोलिसांमार्फत मुलींना अथवा महिलांना ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तात्काळ मदत मिळू शकते.तसेच मुलींना अथवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भया पथकामार्फत केलेली तक्रार व नाव गोपनीय पद्धतीने ठेवून त्यावर कारवाई केली जाते.रोड रोमिओ यांच्याकडून शाळा-महाविद्यालयातील मुलींना त्रास होऊ नये म्हणून शाळा,कॉलेज आवारामध्ये निर्भया पथका मार्फत योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे ज्योती दहिफळे यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.

कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांनी मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या डावपेचाची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली.गुंड अथवा अपप्रवृत्तीच्या हातून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रथमदर्शनी करावयाची उपाययोजना तसेच घ्यावयाची काळजी याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्या हाताच्या साह्याने,पायाच्या साहाय्याने किंवा वेगवेगळ्या शारीरिक तंत्रशुद्ध प्रात्यक्षिकांच्या साह्याने कशाप्रकारे आत्मसंरक्षण करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवले.

प्रशिक्षकांनी लाठी-काठी चे प्रयोग आणि स्वसरक्षणासाठी च्या आवश्यक कसरती व प्रात्यक्षिके याचे प्रशिक्षण दिले.विद्यार्थिनींनीही या सर्व प्रशिक्षणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहल ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी चे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.निलेश नागरे,बी सी एस चे प्रा.गणेश बोरचटे,लॉ कॉलेज च्या प्रा.ऋतुजा काळे,उपप्राचार्य प्रा.शिवाजी कुमकर,प्रा.दिनेश जाधव,क्रीडा शिक्षक सुरेश काकडे,प्रा.विलास दातीर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments