Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 

डोळस असूनपण -

सगळेच अंध कसे ?

शिकले-सवरलेले -

काहीच बोलेना कसे ?


सगळेच्या सगळेच -

आज बुध्दिभ्रष्ट झाले !

बुध्दी असून युध्दाला -

चालना देत राहिले !


जगी कायमस्वरुपी -

असं काहीच नसतं !

एक ना एक दिवस -

निघून जाणं असतं !


चांगलं वागलो तेंव्हा-

कुणा बघवलं नाही !

वाईट वागलो तर -

डोक्यावरच कां घेई ?


राज्यात काय चाललं -

सगळेच जाणतात !

परंतु थांबवायला -

कुणी कसे जाईनात ?


जिथे शोधायला हवे -

तिथे शोधत नाहीत !

नको त्या ठिकाणी मात्र -

शोधायला कां जातात ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर 

( सूर्यकांत ना . कामून )

मो.नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments