Type Here to Get Search Results !

आंबेगाव तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी व्यापक लढा सुरू करणार - शशिकांतजी भालेराव



प्रतिनिधी : पंकज सरोदे 

आंबेगाव तालुक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शासकीय पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी लवकरच तालुक्यातील आंबेडकरी जनतेशी संवाद साधून समाजाला संघटित करून व्यापक लढा सुरू करणार असल्याचा संकल्प दि. २/२/२०२५ रोजी आंबेगाव तालुका बौध्द सेवा संस्थेच्या वतीने मंचर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भालेराव यांनी केला.



आंबेगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन तालुका संघाच्या वतीने सन २०१५ पासून मागणी करीत आहोत. या मागणीची निवेदने तत्कालीन मा. तहसीलदार, मा. सभापती, पंचायत समिती आंबेगाव, गटविकास अधिकारी, मा. जिल्हाधिकारी, मा. स्थानिक आमदार यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून दिली आहेत. रास्तारोको आंदोलनही करण्यात आले आहे त्यावेळी मा. तहसीलदार, मा. उपविभागीय अधिकारी यांनी पुतळा उभारण्याचे आश्वासनही दिले होते परंतु आजतागायत याबाबत कोणतीही कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही. म्हणून यापुढे तालुक्यातील आंबेडकरी जनतेशी संवाद साधून तसेच गाओगावच्या आंबेडकरी संघटनांशी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून व्यापक आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील बैठक १६/२/२०२५ रोजी आयजित करण्यात आली आहे.



भारतीय बौध्द महासभेचे तालुका सचिव सचिन ढोणे, तालुका संघाचे पदाधिकारी चंद्रकांत सोनवणे, किशोर देठे, विनीत लवंदे, मधुकर चाबुकस्वार, शरद भालेराव यांची भाषणे झाली. बैठकीस सुरेश रोकडे, अतिश ढोणे, पंकज सरोदे,सिताताई मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित असून प्रदीप गौतम साळवे यांनी सूत्रसंचालन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments