Type Here to Get Search Results !

कवी शिवदास वाव्हळ यांच्या 'उध्वस्त भिंती' या काव्यसंग्रहाचे ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल मध्ये शानदार प्रकाशन.



ठाणे:- रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड विधानसभा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नीलपुष्प काव्यसंध्या या कार्यक्रमात कवी शिवदास वाव्हळ लिखित हा काव्यसंग्रह राजसा प्रकाशन उल्हासनगर यांनी प्रकाशित केला असून आज या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नीलपुष्प साहित्य समुहाचे आणि सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. राजेश साबळे, ओतूरकर, प्रमुख पाहुणे कवी मा. डॉ, मारुती नलावडे, आंतरराष्टरीय चित्रकार मा. सुरेश डुंबरे, वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे, गायिका संगीत विशारद मा. सौ सुमुग्धा माळी आणि उपस्थित कवी, लेख साहित्यिक अनेक शैक्षणिक, सामजिक संस्थेतील वाचक रसिक मंडळी तसेच कवी शिवदास वाव्हळ यांचा परिवार आणि पाहुणे, मित्र परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.



सदर प्रसंगी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन झाल्यावर कार्यक्रमाच्या पाहुण्या सौ सुमुग्धा माळी यांनी सुंदर ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक सौ. मीनल चौधरी आणि पाहुण्याचा परिचय निवेदिका सौ. निलम शेलटे यांनी करुन देत असताना सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान कवी शिवदास वाव्हळ आणि त्यांच्या परिवाराने केला. 

यानंतर कवी शिवदास वाव्हळ यांच्या 'उध्वस्त भिंती' या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश साबळे, ओतूरकर यांनी सर्व उपस्थित मंडळीचे स्वागत करुन. उध्वस्त भिंती या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले असे जाहीर केले.. त्यांनतर सदर काव्यसंग्रहावर दूर वरून आलेल्या शुभेच्छा संदेश सौ. मीनल चौधरी आणि सौ मेघना देव यांनी त्यांचे खुप सुंदर वाचन केले.

स्वतः कवी शिवदास वाव्हळ यांनी हा काव्यसंग्रह म्हणजे माझ्या मनाची वेदना आहे. जीवन जगत असताना आलेल्या अनुभाचा कटू गोड आठवणी आणि समाजात घडत असलेल्या बऱ्या वाईट घटनांचा वेध घेताना आयुष्याची कशी दमछाक होते. स्वतःचे जीवन आणि इतरांचे जीवन यात काय फरक आहे. यांचा हा काव्यसंग्रह एक नमुना आहे. 

यावर सर्व पाहुण्यांनी आपले या काव्यसंग्रहाबद्दल आपले मनोगत सादर केले. डॉ मारुती नलावडे यांनी पुस्तक विकत घेवून वाचावे. 

प्रा.सुरेश डुंबरे यांनी ज्यांनी सोसले आहे. तेच असे म्हणाला भिडणारे लेखन करू शकतात.

प्रा. नागेश हुलवळे यांनी आपल्या सुंदर गायकी शैलीत सबंधित पुस्तकातील कवितांचा सुमधुर स्वरात सादर केली. 

सुमुग्धा माळी या संपूर्ण पुस्तकातील कविता गावून सादर करण्यासारख्या आहेत. या सोबत त्यांनाही एक कविता सुंदर पद्धतीने गावून सादर केली. त्यांच्या सुंदर गायकीने सभागृह मंत्रमुग्ध झाले. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेश साबळे,ओतूरकर म्हणाले.. आपण वाचाल तर वाचाल असे नुसते म्हणतो. पण किती लोक पुस्तके विकत घेवून वाचतात. समाजात कुटुंब पद्धतीचा ऱ्हास तर झालाच आहे. पण त्यासोबत पत्र लिहिण्याची पद्धतही निकालात निघाली. सावित्री बाई फुले यांनी महिला शिकाव्यात म्हणून पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. त्या भिडे वाड्याची काय अवस्था आहे. आपण ती उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. इंग्रजीच्या उदात्ती कारणामुळे मराठी बोलायला लोकांना वेळ नाही. तिथं पुस्तक विकत घेवून लोक वाचतील असे आपणास वाटते काय? असा प्रश्न करुन 

कमीत कमी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या वेळी भेट म्हणून तरी, पुस्तके भेट द्यावीत. त्यामुळे तरी, घरात जो कोणी वाचक वर्ग असेल किंवा वयोवृध्द मंडळी असतील ते तरी विरंगुळा म्हणून वाचतील.

यानंतर नीलपुष्प मंडळाची काव्यसंध्या कार्यक्रमांची खुप सुंदर मौफिल जमली.. यात अनुक्रमे कवी अभिमन्यू शिरसाट, मास्टर राजरत्न राजगुरु, शाहीर किरण सोनवणे, डॉ. मारुती नलावडे, प्रा. सुरेश डुंबरे, कवयित्री सावित्री ताई झांबरे, सुनीता ताई भालेराव, प्रज्ञारणी सोनवणे, कमल अस्वले, लीलाताई गाजरे, पत्रकार सुभाष जैन, प्रा. नागेश हुलवळे, निवेदिका नीलम शेलटे, राजेश साबळे, ओतूरकर अन्य मान्यवर कवींनी आपला सहभाग नोंदविला. खुप सुंदर काव्यसंध्या संपन्न झाली..

या कार्यक्रमासाठी आयोजक मंडळी पैकी कवी शिवदास सरांचा मुलगा श्री. आणि सौ.जयेश वाव्हळ, मुलगी सौ वृषाली वाघोली जावई श्री. प्रशांत आणि सर्व वाव्हळ परिवाराने अतिशय मेहनत घेवून कार्यक्रमांची शोभा वाढविली. सदर कार्यक्रमास वाव्हळ परिवारातील आप्त ईष्ट नातेवाईक यांची उपस्थिती खुप चांगली होती. यावरुन शिवदास यांचा मित्र परिवार खुप संस्कारी आणि प्रेम आणि जिव्हाळा यांचे प्रतिक वाटले त्यासाठी या ठिकाणी 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या म्हणीची प्रकर्षाने आठवण झाली.

सदर कार्यक्रमाचे आणि नीलपुष्प काव्यसंध्येचे सुंदर सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शनाची गोड कामगिरी निवेदिका सौ नीलम शेलटे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीत होवून या सुंदर सोहळ्याची सांगता झाली.

असे आयोजकांनी कळविले आहे.

शब्दांकन 

राजेश साबळे,ओतूरकर

Post a Comment

0 Comments