Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


आपलं भाकित काय ?

आपणा ठाव नसतं !

आपल्या वागण्यावर -

भाकित ठरू पाहतं !


परस्पराची सावली -

आज वाटते नकोशी !

आपलेपणाच नाही -

सामावून घेऊ कशी ?


आज कोण कुठे आहे -

कुणा एकाही कळेना !

सांगती मजेत मात्र -

मजेत किती कळेना !


जिंदगीच्या प्रवासात -

बरेच काही भेटले !

सोबतीचे सोबतच -

पाठीचे मात्र डसले !


एवढीशी साधी आग -

कधी कधी मोठी होते !

कधी जिथल्या तिथेच -

जागीच विझून जाते !


आयुष्यभर सोबत -

कुणी कां देत असतो ?

खांदा देणारा माणूस -

अधीमधी बदलतो !

@ कवी - सूर्यांबिका , सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .07620540722

Post a Comment

0 Comments