Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


आत्ता सगळंच काही 

होणार खुल्लमखुल्ला !

गुंडागर्दी, खुनीहल्ला 

राजरोस चालणार !


आता सगळेच पक्ष

कायमचे संपणार !

देशात सर्वच ठायी

भाजपाच राहणार !


आत्ता मात्र सर्वत्रच

' हम करेसोच कायदा !

भोळी बिचारी जनता 

कशी जगतील जिंदा ?


लाडकी बहीण आत्ता

झाली आज नावडती !

सत्ता येता बहिणींना 

दाखविली नीच वृत्ती !


नकळत सारे काही 

आत्ताशा घडू लागले !

सत्तापिपासूंच्या हाती 

सारे देशच चालले !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments