चारोळ्या
प्रौढ लोकसंख्येपेक्षा -
मतदार जास्त कसे ?
प्रश्नाचे उत्तर मात्र -
आयोग देईना कसे ?
जुमलाबाजी पक्षात
जुमलाबाजीच नेते !
जुमलाबाजी करीत
मिळवित जाती मते !
गाढवाच्या मते यश
त्याच्यासाठी असो मोठं !
रेसमध्ये नसूनही -
घोडाच भारी वाटतं !
चुकीचे घडू पाहता
चूक सांगणार कोण ?
विरोधक संपले की -
विरोध करील कोण ?
पक्षपात होतो तिथे -
न्यायाची काय अपेक्षा ?
लोकांच्या पदरी मात्र -
नित्य दारुण उपेक्षा !
@ कवी - सूर्यांबिका , सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो. नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments