Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


बंद मुठीतून वाळू 

जशी निसटू पाहते !

तसे आपले आयुष्य 

हळू निसटू पाहते !


सारंकाही घडूनही 

न घडल्याचं वाटतं !

कुठे काही न घडता

घडल्याचं कां वाटतं ?


आजचा माणूस आज

माणसात नाही कसा ?

जिवंतपणीच आज 

मेल्यागत वाटे कसा ?


कसाबसा जगतोय 

आजचा साधा माणूस ! 

परंतु महागाईने 

उद्ध्वस्त केला माणूस 


प्रत्येकाच्या जीवनात 

एक क्षण असा येतो !

जगताना जगण्याचा 

अर्थच सांगून जातो !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो. नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments