जुन्नर तालुक्याचा इतिहास, विशेषतः सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी समाजाचा इतिहास, लढवय्या आणि निष्ठेची एक अनोखी गाथा सांगतो. ब्रिटिश राजवटीच्या काळात, या भागातील आदिवासी आणि गरीब शेतकरी सावकारांच्या अत्याचारांना बळी पडत होते. शेकड्याला शेकडा व्याज, जमीन हस्तगत करणे आणि अमानुष छळ हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले होते.
ब्रिटिशांच्या वरदहस्ताने अंजनावळे , खैरे , खटकाळे , हिरडी , निमगिरी , घाटघर , हातविज , चावंड , पूर , केवाडी , उच्छिल व आजूबाजूच्या परिसरात सावकार गोरगरीब लोकांचा छळ करत होते. अडल्यानडलेल्या आदिवासी व गोरगरीब लोकांना सावकार लोक कर्ज देत आणि शेकड्याला शेकडा व्याज वसूल करत. १९४० च्या दरम्यान सावकारांविरोधात आदिवासींनी बंड पुकारले या बंडाचे नेतृत्व कोंड्या (कोंडाजी) हरी नवले यांच्याकडे सर्वांनी सोपवले. ब्रिटिशांनी गुप्त बातमीदार व फितुरांच्या मदतीने हे बंड चार ते सहा महिन्यातच मोडून काढले. फितुरांनी टोळीची खबर दिली आणि कोपरे या ठिकाणी असणाऱ्या गडदेत ब्रिटींशांच्या बंदुकीच्या गोळीने बंडकरी कोंड्या नवला मारला गेला आणि टोळीतील इतर बंडकरी पकडे गेले. टोळीतील ३१ लोकांनावर खटला दाखल करण्यात आला. यातील दोघांना इंग्रजांनी सोडून दिले. कलम ३३७ प्रमाणे दोघांना माफीचा साक्षीदार बनविण्यात आले. २७ बंडकऱ्यांना कैद झाली.
ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, तेव्हा त्यांनी कैद्यांना शिक्षा देण्यासाठी एक खास पद्धत वापरली. ते कैद्यांना वेगवेगळ्या तुरुंगात पाठवत असत, ज्यामुळे त्यांची माहिती नातेवाईकांना मिळत नसे.
तुरुंगात कैद्यांची माहिती नोंदवताना त्यांचे नाव आणि वडिलांचे नाव लिहिले जाई. आडनाव व पत्ताच्या नोंदी रजिस्टरवर केल्यात जात नसत. त्यामुळे कैद्याला तुरुंगात मारहाण झाली किंवा तो मरण पावला, तरी त्याची माहिती नातेवाईकांना कळत नसे. ब्रिटिश कैद्यांना धरण बांधण्याच्या कामावर नेत असत. शिक्षा पूर्ण झाल्यावर अनेक कैदी घटसर्प या आजाराने मरण पावल्याचे कागदपत्री उल्लेख आढळतात.ब्रिटिशांनी कैद्यांना शिक्षा देण्यासाठी आणि त्यांची माहिती गुप्त ठेवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरली. त्यामुळे अनेक कैद्यांना त्रास सहन करावा लागला आणि काहींना आपला जीव गमवावा लागला.
या बंडाच्या माध्यमातून कोंड्या नवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सावकारांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या बलिदानाला आजही आदराने स्मरण केले जाते.
किरण म्हसकर (जुन्नर) ✍🏻
मो.नं - 9011110569

Post a Comment
0 Comments