Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


जिथे मी मोती वेचली 

तिथे उचलतो माती !

काळवेळ बदलता -

धुपाटणे आले हाती !


वेळ कुणासाठी पण -

कधीच थांबत नाही !

आडवं येईल त्याला -

आडवं करीत जाई !


कालचे रात्रीचे सारे

आज कसे उजेडात ?

आजच्या दिवसातले -

सारे कसे अंधारात ?


गोड माणसे भेटली 

पण गोड ना आयुष्य !

जग गोड म्हणायला -

करू तरी कसे भाष्य ?


स्वप्नात दिसते तशी -

सत्यात कां न दिसेना ?

सत्यात तुला पाहता -

स्वप्न सत्य कां होईना ?


वचन देऊनी मला -

असे कसे फसविले ?

आज वचन न देता -

अशी कां जवळ आले ?

@ कवी - सूर्यांबिका , सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments