Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


जग आपले म्हणून -

जगाशी नाते जोडलो !

नाते हजारोंं, परंतु -

कुठेही ना मी जोडलो !


जगात आलो मी पण -

कुणाचा कुणी ना झालो !

कुणाचा ना मी मुलगा -

ना कुणाचा बाप झालो ?


उजेडात असताना -

सगळे भेटाया आले !

आज अंधारात येता -

कुणी विचारेना झाले !


राज्य सुरक्षित नाही

नेते मात्र आलिशान !

गरिबांच्या जीवनात -

क्षणाक्षणाला मरण !


राज्यात चाललं काय -

कुणा कां कळेना झालं ?

नेत्यांचे घरचे मात्र -

सुखासुखी चांगभलं !


चोरांचा रोज बाजार 

कोट्यांनी रोज खरेदी 

चोरांच्या राजवटीत -

सज्जन येणार कधी ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments