चारोळ्या
दुस-यांना देण्यासाठी -७
नसू दे जवळ काही !
दुस-यांचे मात्र कधी -
हिस्कावून घेणे नाही !
काळानुसार आपण -
कां रे बदलू पहावे ?
आपली कृती पाहून -
काळसुध्दा बदलावे !
धैर्य- धाडसच आम्हां -
पुढे जायला सांगते !
तुम्ही पुढे चालत जा-
मागे मी आहे म्हणते !
आपलेच गाणे गोड -
आपला आवाज छान !
इतरांच्या गाण्यालाही -
आपण द्यावे सन्मान !
जगात मीच एकटा-
शहाणा आणि हुशार !
बाकीचे कळेल कसे -
लढलेच नाही तर !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments