Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


कुंभमेळ्याच्या स्नानाला -

पापीच लाखों जातात !

निष्कंलक लोक मात्र -

घरी स्नान करतात !


पाप करावं कशाला ?

गंगेत न्हावं कशाला ?

गंगेत स्नान केल्यानं -

पाप जाई कां कुठला ?


संत गेले , पंत गेले 

गंगास्नानपण केले !

गंगेत पाप धुवून -

पाप कराया मोकळे !


मनच नाही निर्मळ

गंगेत स्नान कशाला ?

मन आधी शुध्द ठेवा -

शांती लाभेल मनाला ?


गंगास्नान केले तरी - 

आपण होतो कां स्वच्छ ?

जरा स्वतःला विचारा - 

मनाने किती गलिच्छ ?


गंगा इतकी पवित्र 

आपणच पापी केलं !

पापींनी पाप धुवून 

गंगा अपवित्र केलं !


मनच नाही निर्मळ

काय करील साबण ?

तुका म्हंटल्याप्रमाणे -

जगी रे निष्पाप कोण ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments