Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


जग पाह्यचंच तर -

उंबरठा ओलांडून !

जगात चाललं काय -

बघा जरा निरखून !


कालची खंत नसणे -

उद्याची चिंता नसणे !

आजचे आपले जीणे -

जगा आपल्या मर्जीने !


आपल्याहून आपणां -

सांगा कोण आवडतो ?

कारण आपल्यापेक्षा -

चांगला कुणी नसतो !


पालापाचोळ्यासारखा -

संघर्ष उडून गेला !

उद्याची जिंदगी पण-

होई कां पालापाचोळा ?


देवाच्या दर्शनासाठी -

तीर्थाटनच कशाला ?

माणसात देव पहा -

देव येईल भेटीला !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना.कामून )

मो.नं.07620540722

Post a Comment

0 Comments