चारोळया
दगडात देव आहे -
माणूस सांगू शकतो !
माणसातही माणूस -
कां नाही सांगू शकतो ?
जगात येऊनपण -
जगच कसा कळेना ?
मी माणूस तरीपण -
माणूस कां म्हणवेना ?
उपाशीपोटी आपलं -
रोजच होतं मरण !
भरलं पोट असतं -
रोज खाऊन पिऊन !
जगणही बाकी आहे -
मरणही बाकी आहे !
रोजच्या जगण्यातलं -
थोडं वजाबाकी आहे !
माझे मला ठाव नाही -
उद्याला होणार काय ?
वेळ आली तशी जाई -
काळाचं होईल काय ?
कधी कुणाचा तो काळ -
कधी कुणाची ती वेळ !
उद्याला मात्र आपला -
येईलच काळवेळ !
तथ्य काही नसताना -
पथ्य कशाला पाळावे ?
सत्य कळूनदेखील -
खोटे कां बोलू पाहावे ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना.कामून )
मो.नं. 07620540722

Post a Comment
0 Comments