Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


प्रेमाचे भेटले पण -

प्रेमात कुणी ना आले !

भोवताली आज माझ्या -

कोण फिरकू लागले ?


सोडलीस तूच हात -

पुन्हा कां ग हाती हात ?

रस्ता सरळ असता- 

कां तुडविली तू वाट ?


मी ना तुझी झाले राधा -

ना मी तुझी प्रिय मीरा !

कृष्णा, तुझ्या नजरेला -

कशी भिडवू नजरा ?


तुझ्यासोबत जगलो -

तुझ्यासोबत पोळलो !

आज मात्र तुझ्याविना -

एकटा कसा मी मेलो ?


कशातच नसून मी -

तुझ्यात कसा मी आलो ?

नावडताच मी तुझा -

आवडता कसा झालो ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो.नं. 07620540722

Post a Comment

0 Comments