Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा कवी सूर्यकांत कामून यांची रचना



चारोळ्या 


संतोषची क्रूर हत्त्या -

राज्याचीच बेईज्जती !

राज्याचे मंत्रीमंडळ -

गुंडांची कां वाडीवस्ती ?


संतोषच्या हत्त्येमुळे 

महाराष्ट्र हादरला !

आपले समस्त मंत्री -

गळ्यात घालून गळा !


मुंडेंच्या राजीनाम्याने -

प्रश्न सुटणार नाही !

अजुनी हजारों मुंडे -

वागती मजेत दाही !


राज्यात आज सर्वत्र -

दुःशासन - धुतराष्ट्र !

यापुढे दिसेल कसा -

सुसंस्कृत महाराष्ट्र ?


वाल्मिक कराड आत -

मुंडेच कसे बाहेर ?

वरदहस्त कुणाचे -

सांगा अजित पवार ?


इतके घडूनपण -

देवेंद्र थांबले कसे ?

हाती सूत्रे असताना -

दुर्लक्ष केलेच कसे ?


असेच घडते तर -

राज्य वाचेलही कसे ?

सर्वसामान्य जनता -

जगतील तरी कसे ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना.कामून )  

मो.नं.07620540722

Post a Comment

0 Comments