चारोळ्या
दिल्याविना कळे कसे -
आपले हे देणेघेणे !
दिले घेतले तर ना -
जुळू पाहतील मनें !
मनात राहो सदैव -
जग जिंकायची जिद !
जगात राहील मग -
आपली उंचच कद !
संधीचं सोनं आपणां -
करता आलं पाहिजे !
तसे उचलाया हवे -
आपल्या डोईचे ओझे !
वेठीस धरून आज -
खेळले जातात खेळ !
ना कुठे मोकळेपण -
ना नियमही कुठलं !
आज आकाश फाटलं -
धरतीही दुभंगली !
जगवावं तरी कसं -
जीणं होतं वरखाली !
जगणे जगण्यासाठी -
आजची लढाई आहे !
आपले अस्तित्व काय -
जगा दाखविणे आहे !
@ कवी -सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना. कामून )
मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments