Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



चारोळ्या 

 चांगलं वाईट काय -

खरं काय खोटं काय ?

खरं कळूनदेखील -

खोटंच बोलावे काय?


माणूस म्हणून आलो -

माणूसच नाही झालो !

माणूस म्हणूनपण -

ओळखू येईना झालो !


जगात मी आलो पण -

जगणेच नाकारलो !

जगाचे जीणे पाहून -

जगही सोडून दिलो !


जगायचं नाही तर -

कसंही कां जगायचं ?

जगायचं आहे तर -

जगून दाखवायचं !


विचार बदललं की-

वृत्तीपण बदलेल !

आपण कसे वागलो -

तेंव्हा जगाही कळेल !


जुनं तर नेहमीच -

अस्सल सोनं असतं !

उद्याला जुनेच पुन्हा -

फिरून येत असतं ! 

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना.कामून )

मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments